About Us

TRUST OF DECADES



This Shubh journey began with the pure purpose of helping people meet their soul mates; soul mates that complete your Vishva (world). Shubhavishva, since 1988, is known for its glorious services which have earned us the faith of countless people.

It started off with Marathi Brahmin Community matchmaking. Mrs Smita Mankame had a noble cause of helping out physically disabled people to find their match. And it still goes on. Matrimonial services at Shubhavishva for physically disabled people are absolutely free of charge! Just submit your UDID No. And you are all good to go. The days passed but the values never changed. With faith, truthfulness and transparency, we are now serving bigger. The larger platform is now open for all Marathi Hindu Castes. The best part is you have to register once with Shubhavishva and no more charges need to be paid until you get married.

We function in this industry with the trust of people. Mr & Mrs Mankame have always taken care of that trust. Mrs Swaroopa Deolankar is now carrying this legacy successfully from 2018. Our transparent services stand up to our reputation. That’s why a good word of mouth is all we ever got. Leading the front as trustworthy marriage bureau in Pune, Shubhavishva is happily matching the imperfects to make their married life perfect.

दशक विश्वासाचे



दोन भिन्न भाग्यरेषा जोडत, अनेक तरुण-तरुणींना अनुरूप व साजेसा जोडीदार मिळवून देत शुभविश्वचा प्रवास सुरू आहे. आयुष्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व देण्यासाठी एका सोबतीची गरज असते व आपल्याला आपला परिपूर्ण जोडीदार मिळवून देणे हीच आमची इच्छा आहे. अनेकांचा विश्वास जिंकत शुभविश्वने १९८८ ला सुरू केलेला हा प्रवास आजही यशस्वीरित्या सुरू आहे.

मराठी ब्राम्हण समुदायास त्यांचा जोडीदार मिळवून देत सुरू झालेली शुभविश्वची ही वाटचाल आज सर्व जाती धर्मांसाठी सेवा देत आहे. श्रीमती स्मिता मानकामे ह्या दिव्यांग लोकांना विवाहासाठी मदत करत होत्या आणि त्यांचे हे अतुलनीय कार्य अजूनही सुरू आहे. शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी शुभविश्व पूर्णपणे विनामूल्य वैवाहिक सेवा देते! दिव्यांग लोकांना केवळ आपला यूडीआयडी नंबर आमच्याकडे नोंदवणे गरजेचे आहे.

काळानुसार दिवस जरी बदलले असले तरी देखील आमची मूल्ये कायम आहेत. तीच सत्यता, तोच विश्वास आणि तीच पारदर्शकता यांसह शुभविश्व आता विविध सेवा देत आहे. सुरूवातीला केवळ मराठी ब्राम्हण कार्य करणारे शुभविश्व आता सर्व मराठी हिंदू जातींसाठी खुले आहे. शुभविश्वमध्ये एकदा नोंदणी केली की विवाह होईपर्यंत कोणतेही शुल्क देण्याची गरज नसते. पारदर्शकता व उत्तम सेवा यामुळे आम्ही अनेकांचा विश्वास जिंकला आहे व जास्तीत जास्त लोकांची पसंती मिळवली आहे.

विवाह ही दोन भिन्न रंगांना एकत्र आणून जीवनाच्या कॅनव्हास वर सुंदर व रेखीव चित्र रेखाटण्याची एक पद्धत आहे असे म्हणता येईल. वैवाहिक जीवनात प्रत्येक वळणावर नानाविध रंगछटा आपल्याला अनुभवता येतात. कधी मजेदार, समाधानी, आनंदी तर कधी हळवे, भावनिक क्षण आपण अनुभवत असतो. आपला जीवनाचा कॅनव्हास अधिकाधिक आकर्षक व मोहक व्हावा म्हणून असे दोन रंग एकत्र आणण्यासाठी शुभविश्व सज्ज आहे.

आपल्या विश्वासाच्या बळावर आज शुभविश्व कार्यरत आहे. आपली हीच विश्वासार्हता श्री. व सौ. मानकाने यांनी जपली. २०१८ पासून शुभविश्वचा हा वारसा सौ. स्वरूपा देवळणकर यशस्वीरित्या पार पाडत आहेत. आमच्या पारदर्शक सेवा हीच आमची ओळख आहे. पुण्यातील विश्वासार्ह मॅरेज ब्युरो म्हणून नावलौकिक मिळवलेले शुभविश्व अनेकांचे वैवाहिक जीवन परिपूर्ण व सुखी करण्यासाठी सज्ज आहे.

“परिपूर्ण जोडी म्हणजे जेथे एकमेकांचे वेगळेपण आनंदाने स्वीकारले जाते व दोन वेगळ्या मतांचा मोठ्या मनाने स्वीकार करत प्रत्येक क्षण आनंदाने जगला जातो.”
तुम्हाला साजेसा जोडीदार मिळवून देता यावा व आपल्या नव्या सहजीवनाची सुखी व आनंददायी सुरुवात व्हावी यासाठी शुभविश्व सज्ज आहे!

WHY SHUBHAVISHVA? (शुभविश्वच का?)



  • Advanced Platform (प्रगत प्लॅटफॉर्म)

    A matrimony platform availing the members with advanced facilities.
    सदस्यांना अत्याधुनिक सुविधा मिळवून देणारा एक वैवाहिक प्लॅटफॉर्म.

  • For All (सर्वांसाठी उपलब्ध)

    Matrimony services for all Marathi Hindu Castes and Sub-castes.
    सर्व मराठी-हिंदू जाती आणि उप-जातींसाठी विवाह सेवा.

  • Comfort, Transparency & Trust (सोयीस्कर, पारदर्शक आणि विश्वासार्ह)

    Comfortable environment, transparent & trustworthy services.
    अत्यंत सोयीस्कर, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा.

  • Privacy Packages (गोपनीयता पॅकेजेस)

    We value your privacy and design packages accordingly.
    आपल्या सर्व बाबींमध्ये गोपनीयता बाळगतो आणि त्यानुसार पॅकेजेसचे डिझाइन करतो.

  • Lifetime Membership (आजीवन सदस्यता)

    A membership that got once and lasts till your marriage.
    विवाह होईपर्यंत टिकणारी सदस्यता.

  • Free for Physically Disabled (दिव्यांगांसाठी विनामूल्य)

    Lifetime free of cost services for physically disabled people.
    शारीरिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींसाठी आजीवन मोफत सेवा.

  • Happy Marriages (आनंदी वैवाहिक जीवन)

    Happily married couples- Over 30,000 and counting.
    आनंदी विवाहित जोडपे - ३०,००० पेक्षा जास्त आणि अजून.

  • The More the Merrier (द मोर द मेरिअर)

    Extra payment lets you enjoy the additional features.
    इरत अधिक सुविधांसाठी अतिरिक्त देय आकारले जाईल.

“Faith, Truthfulness and Transparency have been our key values.
We have never ever let anything else takeover these values in our business.”

- Mr & Mrs Mankame
“विश्वास, सत्यता आणि पारदर्शकता ही आपली मुख्य मूल्ये आहेत. या मूल्यांना इतर कोणत्याही गोष्टीमुळे धक्का लागणार नाही याची काळजी घेतो.”
- श्री. व सौ. मानकामे

SERVICES (सेवा)





Re-Tweet (रि-ट्विट)


Shubhavishva caters services to young men and women who have been either divorced or have lost their spouse and are in need of remarriage. Membership is valid until marriage is fixed.

ज्या स्त्रियांना किंवा पुरूषांना घटस्फोट अथवा जोडीदाराच्या मृत्यूमुळे पुनर्विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी देखील शुभविश्व एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. विवाह निश्चित होईपर्यंत सदस्यता वैध असते.


Problem? No Problem!
(समस्या? कोणतीही समस्या नाही!)


There are some less fortunate individuals in our society, who are physically/physiologically challenged. Shubhavishva has been catering to them all these years absolutely free of cost and continues to do so.

समाजातील दिव्यांग व्यक्तींना शुभविश्वकडून पूर्णपणे नि:शुल्क सेवा दिली जाते.


Get Together (मेळावे)


We arrange the Get Together time to time where would-be brides and grooms and their parents come together and exchange their interests. All the arrangements are sophisticated yet comfortable.

आम्ही अनेक मेळावे आयोजित करतो यामध्ये वधू, वर व त्यांचे पालक एकत्र येतात. एकमेकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतले जातात. हे मेळावे अत्यंत सोयीस्कर व आधुनिक पद्धतीने पार पडतात.

Shubhavishva Multiservices, 423 A,Deolankar Wada,First Floor,Flat No.102, Shaniwar Peth,Near Ahilyadevi Highschool,Pune 411030.

Time : 12:00 pm to 6:00 pm (Monday Closed) (Visit by Appointment Only)